Connect with us

Nagpur

विजय वासाडें चा होणार पुणे येथे सन्मान

Published

on

कन्हान : – नागपुर जिल्हयातील पारशिवनी तालुक्या तील कन्हान पासुन जवळच असलेल्या टेकाडी (को. ख) गावातील प्रसिध्द कवी, युवा गझलकार विजय वासाडे याना बंधुता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्काराने विश्वबंधुता साहित्य संमेलन पुणे येथे प्रदान करून सन्माणित करण्यात येणार आहे.
विश्वबंधुता साहित्य परिषद पुणेचे पुरस्कार जाहीर यावर्षीचा बंधुता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार नागपुरचे प्रसिद्ध कवी, युवा गझल कार विजय माणिकराव वासाडे यांना २८ व्या विश्व बंधुता साहित्य संमेलन पुणे येथे रविवार दि.१२ एप्रिल रोजी संमेलनाचे उदघाटक प्रा. सुभाष वारे, बंधुता सा हित्य परिषदेचे कार्यध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, संस्थापक प्रसिद्ध कवी चंद्रकांत दादा वानखेडे, सिमा झिंजुरके, कवि संमेलनाध्यक्ष विनोद सावंत आदींच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणा र आहें. तसेच वासाडेच्या सोबत कवी सुशील सातपुते यांना विषबंधुता लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार तर गोपाळ कांबळे यांना पदमश्री नामदेव ढसाळ सा हित्य पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहें. पुरस्कार वितरण सोहळा तसेच निमंत्रित कवी संमेलन पार पडणार आहे.
साहित्य क्षेत्रातील अभुतपुर्व अशा दखलपात्र वाटचालीबद्दल विजय वासाडे यांचे समाजातील सर्व स्थरातुन कौतुक होतं आहें. याप्रसंगी जेष्ठ समिक्षक प्रभाकर तांडेकर, अक्षरक्रांतीचे अध्यक्ष शंकर घोरसे, कवी राजेश माहुरकर, चारोळीमंचचे तुकाराम कांबळे, विनायक चिखलीकर, उदय नेवे, हितेश गोमासे, राहुल गवस, लीलाधर दवंडे, भगवान पाटील, शीतल बोढे आदींनी विजय वासाडे यांचे अभिनंदन केले.

१) प्रसिध्द कवी, युवा गझलकार विजय वासाडे चा फोटो.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Crime

घरगुती गॅस सिलेंडरचा भडका

Published

on

कोराडी : महादुला येथील प्रभाग क्रमांक तीन मध्ये राहणारे अमित शास्त्रकार यांच्या घरी सायंकाळच्या सुमारास घरगुती गॅस सिलेंडरने पेट घेतला. गॅसचा अचानकच भडका उडाल्याने घरातील काचा फुटल्या. घरगुती साहित्य अस्तव्यस्त झाले. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस विभाग व गॅस पुरवठा एजन्सीला माहिती देण्यात आली. गॅस पुरवठा एजन्सी चे सर्व तज्ञ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस विभागाची चमुही घटनास्थळी दाखल झाली. गॅस शेगडी चा नॉब चुकून सुरू राहिल्याने व घरातील दिवा जाळण्याचा पेटवल्याने ही घटना घडल्याचे प्राथमिक अंदाज आहे. सुदैवानं आग लवकर आटोक्यात आली. याच घरी तीन गॅस सिलेंडर भरलेले होते. कदाचित आग पसरली असती तर फार मोठी हानी झाली असती.

Continue Reading

Crime

खापरखेड्यातील रवींद्र वालोकर यांचा भीषण अपघातात मृत्यूदहेगाव रंगारी

Published

on

  • किल्ले कोलार टर्निंगजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; अपघातानंतर वाहन निघून गेल्याची माहिती

खापरखेडा :

खापरखेडा येथील प्रभाग क्रमांक २ मध्ये राहणारे रवींद्र मनोहर वालोकर यांचा नागपूर–मध्य प्रदेश महामार्गावर दहेगाव रंगारी–किल्ले कोलार टर्निंगजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. रविवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार रवींद्र वालोकर यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर संबंधित ट्रक घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. मात्र, या घटनेबाबत पोलिसांकडून अधिकृत तपशील समोर आल्यानंतरच अपघाताची संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होणार आहे.

टर्निंगजवळ नेमके काय घडले?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रवींद्र वालोकर हे आपल्या होंडा दुचाकीने दहेगावच्या दिशेने प्रवास करत होते. ते दहेगाव रंगारी–किल्ले कोलार टर्निंगजवळ आले असताना हा अपघात घडला. यावेळी समोरून चुकीच्या बाजूने बस येत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याची माहिती आहे. दरम्यान, मागून आलेल्या ट्रकची रवींद्र यांच्या दुचाकीला धडक बसली.

धडक बसल्यानंतर रवींद्र हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. अपघाताचा आवाज ऐकून काही नागरिक घटनास्थळी धावले. मात्र, नागरिक घटनास्थळी पोहोचेपर्यंत संबंधित बस आणि ट्रक तेथून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघात नेमका कशामुळे झाला, बसच्या चुकीच्या बाजूने येण्याचा या घटनेशी काय संबंध होता आणि ट्रकचालकाची भूमिका काय होती, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे या घटनेची सविस्तर चौकशी होणे आवश्यक आहे.

पोलिसांची घटनास्थळी धाव
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची परिस्थिती पाहून पुढील कार्यवाही करण्यात आली. या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी घटनास्थळी मिळालेल्या कागदपत्रांची मदत घेण्यात आली.

घटनास्थळी मिळालेल्या भारत सरकारच्या युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) कार्डच्या आधारे रवींद्र वालोकर यांची ओळख पटल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आल्याचे समजते.

हितज्योती आधार फाउंडेशनचे सदस्य गोलू हे जावेद नर्सिंग होमकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील मृतदेह पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी नागपूर येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर
रवींद्र वालोकर यांच्या निधनाची बातमी खापरखेडा परिसरात समजताच शोक व्यक्त करण्यात येऊ लागला. त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा मोठा आघात असून, अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे वालोकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रवींद्र यांचे वडील मनोहर वालोकर हे भाजपचे जुने कार्यकर्ते होते. त्यांचेही यापूर्वी निधन झाले आहे. रवींद्र यांच्या पश्चात आई, पत्नी आणि मल्हार नावाचा मुलगा असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखद परिस्थिती ओढवली आहे.

Continue Reading

Business

विश्वास की चमक के 10 साल पूरे, बेलपांडे ज्वेलर्स का भव्य शुभारंभ आज

Published

on

  • गोधनी रेलवे, भारत पेट्रोल पंप, नागपुर में नई ब्रांच का उद्घाटन, सोने पर 25%, चांदी पर 50% और डायमंड पर 100% मेकिंग चार्ज फ्री, ग्राहकों के लिए विशेष उपहार और फैमिली सेल्फी कॉर्नर

नागपुर, 25 अक्टूबर 2026 :

शहर के प्रतिष्ठित आभूषण प्रतिष्ठान बेलपांडे ज्वेलर्स (BJ) के एक दशक के विश्वास, गुणवत्ता और परंपरा के सफर का नया अध्याय आज से शुरू हो रहा है। गोधनी रेलवे, भारत पेट्रोल पंप, नागपुर स्थित नए भव्य शोरूम का भव्य शुभारंभ 25 अक्टूबर 2026 को हो रहा है। प्रबंधन ने इस शुभ अवसर पर सभी ग्राहकों और शुभचिंतकों को सादर आमंत्रित किया है।

बेलपांडे ज्वेलर्स पिछले 10 वर्षों से “विश्वास की चमक… हमेशा आपके साथ…” के ध्येय के साथ सोना, चांदी और डायमंड के पारंपरिक विश्वास और आधुनिक डिजाइन वाले आभूषणों के लिए जाना जाता है।

शुभारंभ ऑफर – खास छूट :

  1. सोने के आभूषण पर 25% डिस्काउंट + मेकिंग चार्ज पर भी 25% डिस्काउंट
  2. चांदी की खरीददारी पर 50% डिस्काउंट + मेकिंग चार्ज पर भी 50% डिस्काउंट
  3. डायमंड की खरीददारी पर 100% डिस्काउंट मेकिंग चार्ज पर

शोरूम की विशेषताएं :

  • नए डिजाइन : लेटेस्ट और ट्रेंडिंग ज्वेलरी कलेक्शन
  • सभी प्रकार की ज्वेलरी उपलब्ध : हार, अंगूठी, ब्रेसलेट, कुंडल, मंगलसूत्र, पायल
  • 100% हॉलमार्क ज्वेलरी : शुद्धता और विश्वसनीयता की गारंटी
  • विशेष उपहार : शुभारंभ के दिन आने वाले ग्राहकों के लिए खास तोहफा, शॉपिंग के साथ स्पेशल गिफ्ट

शुभारंभ के दिन विशेष आकर्षण :
आयोजकों ने बताया कि इस अवसर पर माननीय अतिथि के रूप में मुख्य अतिथि का आगमन होगा, साथ ही लाइव एंकरिंग और मनोरंजन कार्यक्रम, स्वादिष्ट जलपान की व्यवस्था और परिवार के लिए खास फैमिली सेल्फी कॉर्नर बनाया गया है।

प्रबंधक ने कहा, “एक दशक से आपकी सेवा में, आपके विश्वास ने ही हमें यहाँ तक पहुँचाया है। आइए, शुभारंभ की खुशी में हमारे साथ जुड़िए।”

संपर्क : 9698181920, 7219055556
पता : Belpande Jewellers, Godhani Railway, Bharat Petrol Pump, नागपुर

Continue Reading
Advertisement

Weather data unavailable.

Trending